एक्स्प्लोर
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिघांना भरधाव कारनं चिरडलं
वाशिम: वाशिम जिल्ह्यातल्या सवड गावात भरगाव वेगात असणाऱ्या गाडीनं तीन मुलांना उडवलं. या भीषण अपघातात तीनही मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
वैभव वाळके, अंकित जाधव, करण खानझोडे हे तिघेजण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. रिसोड-वाशिम महामार्गावर असताना त्यांना वाहनानं उडवलं. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.
आज पहिल्यांदाच हे तिघेही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी वाशिमहून येणाऱ्या एका भरधाव इनोव्हा कारनं या तिघांना उडवलं ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement