एक्स्प्लोर
हिंगोलीत भाजप-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचं पथक आलं होतं. मात्र पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली.
हिंगोली : हिंगोलीजवळ असलेल्या गारमाळ परिसरात भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये आज सकाळी तुंबळ हाणामारी झाली. रेशन दुकानावरु भाजप कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान गटात ही हाणामारीची घटना घडली.
रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचं पथक आलं होतं. मात्र पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. यानंतर दोन गट भिडले. या गटांमध्ये लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली. शिवाय या दरम्यान दगडफेक करण्यात आली.
या घटनेत 15 ते 16 जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गारमाळ गावातील परिस्थिती आता नियंत्रणाखाली आहे. गारमाळ आणि शासकीय रुग्णालयात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement