सोयाबीनपासून गुलाबजामून अन् पनीरही बनतं! भावही मिळतोय दणकून, कशी आहे प्रक्रिया
शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळतोय.
Hingoli Soybean Farmer Updates: सोयाबीन हे हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News Updates) प्रमुख पीक आहे. परंतु यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Farmers Issue) चांगलेच आर्थिक संकटात अडकले आहेत. सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन घेतलेले सोयाबीन घरीच ठेवले आहे. परंतु यापासून कवडा गावाच्या शेतकऱ्याने नवीन उपक्रम केला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर निर्मिती सुरू केली आहे. या प्रक्रिया उद्योगातून पनीरला 250 रुपये किलो तर गुलाब जामून ला 200 रुपये किलो भाव मिळतोय.
कवडा गावातील शेतकरी निरंजन कुटे अल्पभूधारक शेतकरी आहेत. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाचे हे शेतकरी उत्पादन घेतात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून या शेतकऱ्याने गट शेती करता एक एकर शेतात सोयाबीनची लागवड केली आणि उत्पादनही भरघोस मिळाले.
एक एकर शेतात 11 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निरंजन यांना मिळाले. परंतु अचानक भाव घसरल्याने सर्व सोयाबीन निरंजन यांनी घरीच ठेवलं. भाव नसल्याने काय करावे हे सुचत नव्हते.
या परिस्थितीत पानी फाउंडेशनच्या वतीने निरंजन यांना सोयाबीनपासून पनीर आणि गुलाब जामुन निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आलं. निरंजन यांना हे लक्षात येताच त्यांनी सोयाबीन प्रक्रियेपासून गुलाब जामून आणि पनीरची घरीच निर्मिती सुरू करायचं ठरवलं आणि हा प्रयोग सुरुही केला.
गुलाबजामून तयार करण्यासाठी सुरुवातीला सोयाबीन दळून घेतल्यानंतर सोयाबीनचे पीठ मळले जाते. त्यानंतर त्यापासून गुलाबजामून तयार केले जातात.
पनीर तयार करण्यासाठी सुरुवातीला सोयाबीन रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावं लागतं. त्यानंतर हेच सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक केलं जातं. त्यानंतर सोयाबीनचे दूध तयार होतं. हे दूध सुती कपड्याच्या सहाय्यानं चाळलं जातं आणि त्यानंतर चाळलेले दूध चुलीवर गरम केलं जातं. उकळलेल्या दुधामध्ये लिंबाचा रस टाकल्यानंतर ते दूध फाटते आणि त्या दुधाचं पनीर तयार होतं. एक किलो दुधापासून एक किलो 200 ग्रॅम पनीरची निर्मिती होते.
ज्या पध्दतीने बाजारातून जनावरांच्या दूधापासून तयार केलेलं पनीर मिळतं, त्याचप्रमाणे या शेतकऱ्यानं पनीर आणि गुलाबजामून तयार केलेत. एक किलो सोयाबीन पासून 1200 ग्रॅम पनीर तयार केले जाते. हे पनीर 250 रुपये किलोप्रमाणे विक्री होते.
एक किलो सोयाबीन पासून दीड ते दोन किलो गुलाब जामून तयार होतात 200 रुपये किलोप्रमाणे या गुलाबजामूनची मागणी आहे. या शेतकऱ्यांना सोयाबीनपासून असे पदार्थ बनवता येऊ शकतात याची कल्पना सुद्धा नव्हती. पण पानी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना याची सविस्तर माहिती देण्यात आली.
ही बातमी देखील वाचा
खास बातमी! हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची कमाल, बनवले सोयाबीनचे गुलाबजामून, आपण टेस्ट केलेत का?