Hingoli : भाजपच्या माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या मुलानं हिंगोली (Hingoli) शहरातील विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी तर माजी नगराध्यक्ष यांनी संबंधित पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पिता-पुत्रावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सात एप्रिलला हा गुन्हा दाखल होऊन देखील अद्यापही आरोपी अटक न केल्यामुळे आता या प्रकरणात थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्ष्य घातले आहे. तात्काळ आरोपीला अटक करण्याचे हिंगोली पोलिसांना राज्य महिला आयोगाच्या वतीने निर्देश देण्यात आले आहेत. 


हिंगोली नगरपरिषदेचे भाजप माजी नगराध्यक्ष यांच्या मुलाने हिंगोली शहरातील रहिवासी असणाऱ्या 22 वर्षीय पीडित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला त्याचे वडील भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी पीडित महिलेला धमकी दिली की झालेली घटना कोणालाही सांगू नको,अन्यथा आमची बदनामी होईल जर कोणाला सांगितलं तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली आहे, असे तक्रारीत नमूद केल्यावरून या बापलेकाच्या विरुद्ध हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विशेष म्हणजे हा गुन्हा सात एप्रिल रोजी दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आतापर्यंत अद्यापही आरोपीला अटक न केल्यामुळे या प्रकरणी  हिंगोली पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक करणे गरजेचे असताना सुद्धा पोलिसांनी अटक केलेले नाही.  


त्यामुळे आता या प्रकरणात थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्ष घातले आहे या प्रकरणात असलेल्या आरोपी अद्यापही फरार असून त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कदम कारवाई करत संबंधित कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी हिंगोली पोलिसांना दिले आहेत  ही माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा  रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून दिली आहे. आता हिंगोली पोलीस या प्रकरणात कधीपर्यंत आरोपीला अटक करून त्यांच्यावर कडल कारवाई करतील हे बघणे तितकेच महत्त्वाचे राहिले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :