Maharashtra Sindhudurg Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांवरच चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पोलीस कर्मचारी रमेश नारनवर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पाठीवर चाकूचे दोन वार करण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी संशयित आरोपी राजबुल अंकुश देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 


सिंधुदुर्गातील ही धक्कादायक घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यात कोकिसरे नारकरवाडी येथे घडली. संशयित आरोपीचे काल आई-वडिलांसोबत भांडण झालं होतं. यातून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपी हा दोन्ही हातात चाकू घेऊन फिरत होता. त्यानंतर पोलीस कर्मचारी रमेश नारनवर हे पकडण्यासाठी पुढे गेले. मानसिक संतुलन बिघडलेलं असल्यानं संशयित आरोपीला अधिक उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न नारनवर यांनी केला. 


दरम्यान, संशयित आरोपीनं नारनवर यांच्या पाठीवर सपासप वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर याच संशयित आरोपीनं आपल्या वडिलांना देखील मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणी संशयित आरोपीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व पोलीस कर्मचारी नारनवर यांच्यावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णात पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपीच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक संतुलन बिघडलेल्या या व्यक्तीने थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान संशयित आरोपी हा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :