Hingoli : संतापजनक! उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वॉर्डात रात्रभर ठेवला मृतदेह; वसमत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
Hingoli Basmat Sub District Hospital News Update : वसमतमधील उपजिल्हा रुग्णालयात एक मृतदेह उपचार घेत असलेल्या वॉर्डात रात्रभर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Hingoli Basmat News Update : हिंगोलीमधील वसमतमध्ये असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक मृतदेह चक्क अपघात विभागात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार वसमत उपजिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. हा मृतदेह रात्री रात्रभर या विभागात ठेवण्यात आला. यामुळं इथं उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रात्र भीतीच्या सावटात काढावी लागली.
विशेष म्हणजे रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शवविच्छेदनगृहात सुसज्ज असे नियोजन केलेले असताना सुद्धा अशा पध्द्तीने मृतदेह अपघात विभागात ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळं वॉर्डमधील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहिती अशी मिळाली आहे की, एका अपघातामध्ये गणपत शिरसे या इसमाचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन करण्यासाठी हा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी हा मृतदेह चक्क उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या अपघात विभागात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे रात्रभर हा मृतदेह रुग्णालयाच्या अपघात विभागात ठेवल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदनगृहामध्ये लाईट नाही आणि शीतपेटी बंद आहे. त्यामुळे हा मृतदेह अपघात विभागात ठेवल्याचं स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रतापामुळे पुन्हा एकदा वसमत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. आता या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यावर आता काय कारवाई केली जाणार हे बघणे महत्वाचे आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या