एक्स्प्लोर

निकालानंतर शिंदे गट भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, हिंगोलीत गोळीबाराच्या घटनेने तरुणासह चौघे जखमी

मराठवाड्यात अटीतटीच्या निकालानंतर हिंगोलीत निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची चर्चा होती. या हाणामारीचे आणि गोळीबाराचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही.

Hingoli Assembly Election result 2024:महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली. निकालाच्या शेवटच्या फेऱ्या समोर येत असताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. पण हिंगोलीत निकालानंतर शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं मोठा राडा झाल्याचे सांगण्यात आले. या हाणामारीत तीन ते चारजण जखमी झाले असून गोळीबार करण्यात आल्यानं एक तरुण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटन शनिवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणासह चौघांन उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले शिंदेसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यात अटीतटीच्या निकालानंतर हिंगोलीत निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची चर्चा होती. या हाणामारीचे आणि गोळीबाराचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही.

नक्की झाले काय?

हिंगोलीमध्ये काल विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा  झाला आहे. काही कार्यकर्त्यांनी मिळून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला आहे. यात चव्हाण यांच्या घरा समोरील दोन चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या आहेत. या राड्यात गोळीबारही झाल्याची माहिती समोर येत आहे. कळमनुरी विधानसभेत विजयी झालेले संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे त्यांना हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे  तर इतर ३-४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तलवारीच्या वारामुळे पप्पू चव्हाण यांच्या भावाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पप्पू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून  हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये 60 ते 70 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे  दरम्यान या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान झालं. मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आव्हान होतं.  महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आव्हान होतं. निकालानंतर राज्याचं सत्तेचं चित्र स्पष्ट झालं असून महायुतीनं मुलुख मैदानी बाजी मारल्याचं दिसून आलं. दरम्यान हिंगोलीत विधानसभेसाठी तानाजी मुटकुळे हे भाजपकडून उभे होते. तर उद्धव ठाकरे गटाकडून  रुपालीताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात भाजपचे तान्हाजी मुटकुळे विजयी झाले.

 

हिंगोलीच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यामध्ये झालेल्या हाणामारीत चौघेजण जखमी झाले तर गोळीबारही झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला. कळमनुरी मतदारसंघातील विधानसभा मतमोजणीपूर्वी काही तरुणांनी कयाधू अमृतधार महादेव मंदिरात पूजा सुरू केली होती दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर जमावाने बळसोंड भागात जाऊन एका घरावर हल्ला केला. यात संजय चव्हाण हा युवक जखमी झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaGadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पलTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Alpha Gereration : मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
मिलेनियल्स, जेन Z नंतर आता 'ही' जनरेशन; पिढ्यांची नावं कशी ठरवली जातात?
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Embed widget