एक्स्प्लोर

Hingoli : भाजप जिल्हाध्यक्षाच्या धास्तीने माझ्या पतीचा मृत्यू: मयत लिपिकाच्या पत्नीचा आरोप

मयताने मृत्यूपूर्वी संपूर्ण प्रकार एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. ती चिठ्ठी काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती.

हिंगोली: भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांच्या धास्तीने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणीही तिने पत्राच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, मयताने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यांच्या हिंगोली जिल्ह्यात दोन शैक्षणिक संस्था आहेत. या दोन पैकी हात्ता गावातील शैक्षणिक संस्थेवर उत्तम काईट हे लिपिक पदावर होते आणि त्यांचे पुतणे पांडुरंग काईट हे वारंगा येथील संस्थेवर नोकरीला आहेत. 30 एप्रिल रोजी अचानक वारंगा गावातील वडकुते यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत असणारे मयत उत्तम काईट यांची पुतणे पांडुरंग काईट यांना कर्तव्य मुक्त करण्यात आले. त्यामुळे कागदपत्र हस्तगत करण्यासाठी दोन्हीही शैक्षणिक संस्थेवरील शिक्षकांना वारंगा येथील शैक्षणिक संस्थेवर बोलवण्यात आले आणि त्या ठिकाणी पांडुरंग काईट यांना कागदपत्र देण्यात आले. त्या कागदपत्रांवर खाडाखोड करण्यासाठी मयत लिपिक उत्तम काईट त्यांना वडकुते आणि त्यांच्या दोन मुलांकडून धमकावण्यात आले. त्यावर उत्तम काईट ऐकत नसल्याने उत्तम काईट यांना शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रामराव वडकुते यांनी त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याचा आरोप मयत उत्तम काईट यांच्या पत्नीने केला आहे

मयत लिपिक उत्तम काईट यांनी मृत्यूपूर्वी संपूर्ण प्रकार एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. ती चिठ्ठी काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. त्यांना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या संस्थेचे अध्यक्ष रामराव वडकुते आणि त्यांच्या दोन मुलांनी त्रास दिला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रामराव वडकुते आणि यांच्या दोन मुलांनी उत्तम काईट यांना मारहाण केल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा समाज माध्यमात व्हायरल होत आहे. या प्रकरणी रामराव वडकुते यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत 

उत्तम काईट यांच्या निधनानंतर आपल्याला न्याय मिळावा यासाठी काईट कुटुंबीय प्रशासन दरबारी खेटा मारत आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळेस निवेदन देऊनही त्यावर कारवाई होत नाही. विशेष म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतरसुद्धा आठ दिवस कुठलीही कारवाई केली नसल्याचा धक्कादायक खुलासा मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Embed widget