एक्स्प्लोर

मोठी बातमी: आता वाऱ्याच्या वेगाने गाड्या पळणार, चार दिवसानंतर राज्यातील महामार्गांवरील स्पीड वाढवणार

National Highway Speed Limit : राज्य सरकार आणि केंद्रात याबाबत वेगवेगळे नियम असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत होता.

National Highway Speed Limit : देशातील द्रुतगती मार्ग (Expressway) आणि राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highway) वाहनांची वेगमर्यादा (Speed Limit) वाढवली जाणार असून, पुढील चार दिवसांत याबाबत आदेश काढला जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि केंद्रात याबाबत वेगवेगळे नियम असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत होता. त्यामुळे यावर तोडगा काढण्यात आला असून, चार दिवसांत याचे आदेश निघणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. 

सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांसाठी निश्चित केलेली कमाल वेग मर्यादा (Maximum Speed Limit) राष्ट्रीय महामार्गांवर 100 किमी प्रतितास इतकी आहे. तर द्रुतगती मार्गांवर 120 किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा आहे. मात्र असं असले तरीही याच महामार्गावर तैनात असलेले राज्य महामार्ग पोलीस गाडी 90 च्या वरती गेल्यावर 2 हजारांचा दंड ठोठावतात. त्यामुळे केंद्र आणि राज्यात याबाबत समन्वय नसल्याने याचा फटका वाहनचालकांना बसत होता.

दरम्यान याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दाखवत सर्व प्रकार समोर आणला होता. त्यानंतर याची दखल घेत गडकरी यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांनी देशातील सर्वच राज्यातील रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. तर पुढील चार दिवसांत नवीन वेग मर्यादेबाबत आदेश काढले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. 

काय म्हणाले गडकरी? 

पैठण येथे पत्रकार परिषदेत 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, या विषयात केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही अधिकार आहे. मी यासाठी दिल्लीत रस्ते वाहतूक मंत्र्यांची बैठक बोलावली होती.  ज्यात सर्वांचा सल्ला घेतला. ज्यात नवीन स्पीड अंतिम करण्यात आली आहे. तसेच याबाबत पुढील तीन चार दिवसांत आदेश काढण्यात येणार आहे. या आदेशात स्पीड वाढवण्यात आली आहे. पण यात दोन प्रकारचे मतं आहेत. ज्यात 140 किलोमीटरची स्पीड ठेवण्यास काहींचा विरोध आहे, तर काहींचा पाठींबा आहे. त्यामुळे यातील समन्वय साधून स्पीड ठरवण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारला दोन-तीन दिवसांत गॅझेट नोटिफिकेशन जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकार सुधारित गॅझेट नोटिफिकेशन काढतील. यातून तुम्हाला दिलासा मिळणार असून, पण तो दिलासा काय असणार आहे हे आत्ताच सांगणार नसल्याचे गडकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Buldhana News : राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 816 कोटींच्या शेळद ते नांदुरा प्रकल्पासह विविध विकासकामांचं लोकार्पण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget