एक्स्प्लोर
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन
हायकोर्टाच्या आदेशानुसार, ही समिती 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतन सुधारणेबाबत विचार करेन.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याच्या बाबतीत हायकोर्टाने दिलेल्या सुचनेनुसार राज्य सरकारने उच्चाधिकार समितीची स्थापना केली. या समितीमध्ये परिवहन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त आणि कामगार आयुक्त यांचा समावेश आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. हायकोर्टाच्या आदेशानुसार, ही समिती 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतन सुधारणेबाबत विचार करेन. तसेच 22 डिसेंबर 2017 पर्यंत आपला अंतिम निष्कर्ष सादर करणार आहे.
समितीचं काम काय असेल?
- सध्याच्या वेतनश्रेणीचा अभ्यास करुन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते निश्चित करण्यासाठी शिफारस करणं
- वेतन संरचनेतील सुधारणेची उत्पादकतेतील वाढीशी सांगड घालणं
- सध्या कामगारांना वेतनाखेरीज अनुज्ञेय असलेल्या भत्त्यांचे पुनर्विलोकन करुन त्यांचा अंतर्भाव असलेली वेतन संरचना सुनिश्चित करण्यासाठी भत्त्यांचं सुलभीकरण आणि सुसूत्रीकरण करणं
- महामंडळाची आर्थिक स्थिती, महामंडळाच्या दैनंदिन कामकाजासाठी तसेच विकासासाठीच्या खर्चासाठी पर्याप्त साधनसामुग्री उपलब्ध असण्याची आवश्यकता, या शिफारशीचा राज्य शासनावर पडणारा संभाव्य आर्थिक बोजा, वेतनवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांवर होणारी भाडेवाढ या बाबी विचारात घेऊन शिफारस करणं
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, अखेर लालपरी रस्त्यावर
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
“एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा”
उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार?
प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक
अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement