एक्स्प्लोर
कोल्हापूर : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
काल मध्यरात्री 3 वाजता राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इशारा पातळीच्या दिशेने वाढ होत आहे.
कोल्हापूर : धरणक्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढली असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची रीपरीप सुरुच आहे. त्यामुळे काल मध्यरात्री 3 वाजता राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इशारा पातळीच्या दिशेने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 38 फुट 4 इंचावर आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पंचगंगेची पातळी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.
कोल्हापूरसह मुंबई, ठाणे, कल्याणमध्येही काल रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement