नवी दिल्ली : राज्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची भेट घेणार आहेत. त्याआधी राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. राज्यात अधिक कोरोना लस पुरवण्याची मागणी करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 


राज्यात एक कोटी 77 लाख लोकांना यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कस, 45 वर्षावरील विविध आजारांनी ग्रस्त नागरिक यांना 2 कोटी 20 लाख लसीचे डोसेस पुढील तीन महिन्यात लागणार आहेत. सध्या रोज सव्वा लाख नागरिकांचं लसीकरम केलं जात आहे. मात्र आठवड्याला 20 लाख डोसेसची गरज आहे. त्यावेगाने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकार नक्की मदत करेल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. 


राज्यात आज 15 हजार 51 कोरोना बाधितांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू; रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर




ज्या गतीने राज्याला कोरोना लस मिळायला हवी, त्या गतीने लस मिळावी हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात लसीकरणाकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. 60 वर्षाच्या आणि विविध आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांनी वेळेत लस घ्यावी. लस सुरक्षित आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 


राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात- केंद्रीय आरोग्य मंत्रालय


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही सुरूवात असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं म्हटलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात निर्बंध लागू