Pravin Darekar on Manoj Jarange : मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उपोषकर्ते मनोज जरागेंना सवाल
तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.
![Pravin Darekar on Manoj Jarange : मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उपोषकर्ते मनोज जरागेंना सवाल Has the Maratha community named 7 12 after you BJP leader pravin Darekar asks to manoj jarange patil Pravin Darekar on Manoj Jarange : मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा उपोषकर्ते मनोज जरागेंना सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/22/a0e77da42c984265ead702c7d709b92c1721653977642736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pravin Darekar on Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलने केली, बलिदान दिले. अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले, अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.
एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका
दरेकर म्हणाले की, जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे. हे मराठा समाजाला माहित आहे. म्हणून समाज आपल्या पाठीशी उभा आहे. पण तुम्हाला कुणी काही बोललं तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद केले पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात आणि दुसऱ्याला मुजोरडा, माजोरडा बोलायचे. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्व करा. सरकार मराठा समाजासाठी काय करतंय ते कालच्या कार्यक्रमात आम्ही दाखवले. मराठा समाजासाठी ज्यांनी पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी पुस्तिका तयार केली आणि एक लाख बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवले तेही जाहीर केले.
आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत
मराठा समाजाच्या प्रश्नी सरकार सकारात्मक आहे, चर्चा करत आहे. परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची दखल घेण्याऐवजी शिवराळ भाषा वापरली जाते. आम्हीही 20 वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. गरीब कुटुंबातून येऊन आम्ही प्रगती केलीय. सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. संयमाने बोला. मागण्या ताकदीने मांडा आम्ही सोबत आहोत. दरेकर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावे. सत्तेत येऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. आता सत्तेत आहेत त्यांच्याकडून दिरंगाई होतेय त्याची कारणेही त्यांना समजतील. त्यांनी सत्तेत यावे यासाठी आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु विशिष्ट लोकांना नजरेसमोर ठेऊन आपले टार्गेट करू नका. आपण सांगता महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर चालतील, शिंदे-पवार यांचे चालतील. भाजपा आणि फडणवीस यांचे उमेदवार पाडणार म्हणजे डाल मे कुछ काला है असा संशयही दरेकरांनी व्यक्त केला. तुमचा उद्देश हा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवणे हा आहे का? मराठा समाज हा सर्व पक्षांत आहे. समाजात विभाजन होऊ नये याकरिता समाज शांततेत आहे. पण मी बोलेन तेच समाज या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर यायला पाहिजे, असे दरेकर म्हणाले.
जरांगे एकप्रकारे महाविकास आघाडीचा बचाव करत आहेत. त्यांनी शरद पवारांना, उद्धव ठाकरें, काँग्रेसच्या नेत्यांना विचारावे की ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय? या तिन्ही पक्षांना काहीच विचारायचे नाही कारण सरकार म्हणून काम करत असताना एखाद्या प्रश्नावर, आंदोलनावर निर्णय घेत असताना त्याकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिले जाते. सरकारला सर्व जातीधर्म यांना एकत्रित करून निर्णय घ्यावा लागतो. जरांगे यांनी संयमाने आंदोलन करावे, आक्रमक भुमिका घ्यावी. जागतिक स्तरावर मराठा समाज आपली शक्ती शांततेच्या मार्गाने दाखवू शकतो आणि सरकारवर दबाव आणून न्याय मिळवू शकतो हा संदेश गेलाय. शिवराळ भाषा प्रश्न सोडवायला योग्य नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)