एक्स्प्लोर

Happy New Year 2023 Live updates: ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत, जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह

Happy New Year 2023 Live updates: सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. नवीन वर्षातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
Happy New Year 2023 Live updates New Year Eve celebrations Welcome 2023 wishes twitter reaction Happy New Year 2023 Live updates: ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत, जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह
Happy New Year 2023 Live updates

Background

New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे.  राज्यातील मुख्य पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाली आहेत... तर देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याकडे अनेकांचा कल आहे.. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूरसह अनेक मंदिरांकडे भाविकांना धाव घेतलीये. दरम्यान नववर्षाच्या स्वागताला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झालेत.

नववर्षाच्या निमित्तानं चर्चगेट ते विरार मार्गावर 8 विशेष लोकल धावणार आहे. मध्य मार्गावर CSMT वरून रात्री दीड वाजता शेवटची लोकल कल्याणसाठी सुटणार आहे तर हार्बर मार्गावरही शेवटची लोकल दीड वाजता धावणार आहे.  नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झालेत... चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे... कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.. पोलिसांकडून मद्यपींची ब्रेथ अॅनलायझरनं चाचणी करण्यात येणार आहे... नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय.. 

नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांकडे भाविकांनी धाव घेतली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे. 

आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानं यांनी घेतला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठी रोशनाई केल्याचं दिसत आहे

 

 

11:27 AM (IST)  •  01 Jan 2023

Dhule Marathon : मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत

धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता, बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलें होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

11:27 AM (IST)  •  01 Jan 2023

Shanishinganapur : शिंगणापुरात भाविकांची गर्दी

Ahmednagar : नववर्ष स्वागततासाठी देश, विदेशी, राज्यांच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत. शनिवारी लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शिंगणापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आठ दिवसासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद, बर्फीचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली

व्हिडीओ

Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Embed widget