नांदेड: शीख धर्मीयांकडून शिखांचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यासाठी शहरातील सचखंड गुरुद्वारासह आजूबाजूचा परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे.


शीख धर्मियांचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंती निमित्त शहरातील सचखंड गुरुद्वारा परिसर फुललाय. शिख धर्मियांसाठी नांदेड हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते.


श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला होता. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. गुरु गोविंद सिंह यांचे मुळ नाव गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699 मध्ये बैसाखीच्या पवित्र दिनी गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांच्या बालपणाची सुरुवातीची पाच वर्ष पाटना येथे गेले.


Guru Gobind Singh Jayanti 2021: पंतप्रधान मोदींची गुरु गोविंद सिंहांना आदरांजली, म्हणाले- समाजासाठी जीवन समर्पित केलं


गुरु तेगबहाद्दूर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले.


धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले.


गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना व अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. असं सांगितलं जातं की सलग पाच महिने लिखाण करुन गुरुवाणी पूर्ण करण्यात आली होती.


गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरातआपला देह त्यागला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. या ठिकाणच्या सचखंड व नागिना घाट येथील गुरुद्वारा परिसरस हा संपूर्ण विद्युत रोषणाईने व फुलांनी सजवला गेलाय. 'जो बोले सोनिहाल, सस्त्रीया काल', 'वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह' च्या गजरात संपूर्ण परिसर निनादून निघत आहे. श्री गुरु गोविंदसिंगजी यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.


सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींची रकाबगंज गुरुद्वाराला भेट, गुरु तेगबहादूर यांच्या समाधीसमोर नतमस्तक