नवी दिल्ली: शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. गुरु गोविंद सिंहानी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि आयुष्यभर ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिल्याचं पंतप्रधानांनी सागितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून गुरु गोविंद सिहांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, "प्रकाश पर्वाच्या या पवित्र क्षणी मी गुरु गोविंद सिंहांना नमन करतो. त्यांनी आपले जीवन न्यायसंगत आणि समावेशी समाजाच्या निर्मितीसाठी समर्पित केलं. ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिले. या प्रसंगी आम्ही त्यांचे साहस आणि बलिदानाचे स्मरण करतो."





सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींची रकाबगंज गुरुद्वाराला भेट, गुरु तेगबहादूर यांच्या समाधीसमोर नतमस्तक


गुरु गोविंद सिंहाच्या 350 व्या प्रकाश पर्वाच्या प्रसंगी 2017 साली पटना साहिबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी सांगितलं की त्यावेळी गुरु गोविंद सिंहाना श्रध्दांजली देण्याची संधी मिळाली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गुरु गोविंद सिंहांची त्यांच्यावर विशेष कृपा राहिली आहे. गुरु गोविंद सिंहांचा 350 व्या प्रकाश पर्वाचा कार्यक्रम त्याच्या कार्यकालात आयोजित करण्यात आला. गुरु गोविंद सिंहांचा जन्म पाटण्यात झाला होता. त्यांची जयंती शिख समाजातर्फे प्रकाश पर्वाच्या स्वरुपात साजरी केली जाते."





G-7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना ब्रिटनचे आमंत्रण, त्यापूर्वी बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा शक्य


शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहांनी 1699 साली बैसाखीच्या दिनानिमित्त खालसा पंथाची स्थापना केली होती. त्यांनी जीवनभर अन्याय, अधर्म, अत्याचाऱ्याच्या विरोधात लढा दिला.


हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु गोविंद सिंहांचा जन्म पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीमध्ये झाला होता. त्यांनी 'वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह' ही खालसा वाणी शिख समाजाला दिली.


Budget 2021 | अर्थसंकल्पाच्या आधी येणारा आर्थिक पाहणी अहवाल का असतो महत्वाचा? जाणून घ्या सविस्तर...