नांदेड : एका डुकरांनी भिकाऱ्याचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शासकीय रुग्णालयासमोर घडलेल्या घटनेनं नांदेडमध्ये खळबळ पसरली आहे. रात्रीच्या वेळी डुकरांनी भिकाऱ्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडल्याची माहिती मिळत आहे. डुकरांच्या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.


नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयासमोर अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका भिकाऱ्याचे डुकरांनी लचके तोडून खाल्ले आहेत. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात समोरच्या परीसरातच हा धक्कादायक प्रकार घडला. भर वस्तीच्या ठिकाणी आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डुकरांनी हल्ला केलेला व्यक्ती हा भिकारी असून तो कचरा असणाऱ्या ठिकाणी बसलेला होता. रात्रीच्या वेळी त्याच्यावर डुकरांनी हल्ला केला. त्यानंतर त्याचे लचके तोडून खाल्ले. डुकरांनी केलेल्या हल्ल्यात या भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहेत. तसेच संबंधित प्रकाराबाबत हळहळही व्यक्त केली जात आहे.


घटनेसंदर्भात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला असता, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, संबंधित घटना रात्रीच्या वेळी घडलेली आहे. डुकरांनी भिकाऱ्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडून खाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, वर्दळीच्या परिसरात आणि विशेषतः शायकीय रुग्णालयाच्या परिसरातच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पुण्यात अवतरला गवा, रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पण जीव वाचवण्यात अपयश