एक्स्प्लोर
अज्ञातानं भरदिवसा महिलेची वेणी कापली, औरंगाबादमधील घटना
औरंगाबादमध्ये भरदिवसा एका महिलेची वेणी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद : मुंबईपाठोपाठ आता वेणी कापण्याचे लोण औरंगाबादमध्ये येऊन पोहोचलं आहे. औरंगाबादमधील छावणी बाजार परिसरात एका महिलेची वेणी अज्ञातानं कापल्याची घटना घडली आहे. भरदिवसा वेणी कापल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला आणि तिचा पती काल (शुक्रवार) बाजारात गेले असताना एका अज्ञात व्यक्तीनं महिलेची वेणी कापली. मात्र, घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान, याप्रकरणी छावणी पोलिसांत अज्ञाताविरोधात गन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतल्या भायखळा आणि वडाळामध्येही अशीच घटना घडली होती. यात तीन महिलांच्या वेणी कापण्यात आल्या होत्या. या घटनांमुळे महिलांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. संबंधित बातम्या : झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























