एक्स्प्लोर
'हाफिज सईद दाऊदच्या मदतीनं भारताविरोधात जिहाद पुकारणार'

कोल्हापूर : हाफिज सईदला अमेरिकेच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आलं. पण सईद अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने भारताविरोधात जिहाद पुकारणार असल्याची कबुली देणारे वक्तव्य सईदच्या मुलानेच केल्याची माहिती ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. कोल्हापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. निकम म्हणाले की, ''हाफिज सईदला अमेरिकेच्या सांगण्यावरुन नजरकैदेत ठेवण्यात आलं. याच्या निषेधार्थ सईदच्या मुलाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये मोर्चा काढला होता. यावेळी बोलताना त्यांने भविष्यकाळात हाफिज सईद दाऊदच्या मदतीने भारताविरोधात जिहाद पुकारणार होता. अशी जाहीर कबुली दिली होती. त्याचे हे वक्तव्य भारतासाठी अतिशय घातक आहे.'' अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्याच्या वक्तव्यावरून पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम असल्याचं स्पष्ट होतं, असं सांगून निकम पुढे म्हणाले की, हाफिज सईदची जमात-उद-दावा ही संघटना धार्मिक नाही. वास्तविक ही संघटना लष्कर-ए-तोयबाचेच दुसरे रुप आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. हाफिज सईद आणि दाऊद हे दोघेही अमेरिकेचे गुन्हेगार असून सईदच्या मुलाचे वक्तव्य अमेरिकेने गंभीर्याने घेऊन पाकिस्तानवर दडपण आणण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















