एक्स्प्लोर
Advertisement
नगरमध्ये जमिनीच्या वादातून शाळकरी मुलावर गोळीबार
अहमदनगर : नगरमधील श्रीगोंद्यात सहावीतल्या मुलावर गोळीबार करण्यात आला आहे. शाळेतून आईसह घरी येताना हा गोळीबार करण्यात आला. शेताच्या वादातून करण कांडेकर या मुलावर गोळीबार झाला आहे.
या गोळीबारात करणच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. संजय काटे या माजी सैनिकानं बारा बोअरच्या गनमधून गोळीबार केला. सुरोडी गावात काल सायंकाळी चारच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. सकाळी करणचे वडील आणि काटे यांच्यामध्ये शेताच्या हद्दीवरुन वाद झाला होता.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेल्यावर काटेनं गोळीबार केला. करणवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काटेला ताब्यात घेऊन त्याची गनही जप्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement