एक्स्प्लोर
Sharad Pawar | शरद पवार यांच्या नावे ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्यात येणार?
शरद पवार यांच्या ग्रामविकासातील योगदानाची अनोखी दखल राज्य सरकारने घेतली आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावे ग्रामसमृद्धी योजना सुरु करण्यात येणार आहे. मनरेगा आणि राज्य योजनेच्या एकत्रिकरणातून 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' सुरू होणार आहे.
शरद पवार यांच्या ग्रामविकासातील योगदानाची अनोखी दखल राज्य सरकारने घेतली आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. गावांसाठी आणि गावातील प्रत्येकासाठी योजना असल्याची प्राथमिक माहिती आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
























