ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवले आहे. ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी  34  ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह  219 सदस्यांच्या जागांसाठी 613  उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष  म्हणजे  42  पैकी 6 ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात  सर्वाधिक 20 ठिकाणी भाजपाचे  पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल तसेच ठाकरे गटाचे पाच तर दोन ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.


राज्यातील 7,682 ग्रामपंचायंतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये  65,916 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 14, 028 सदस्य बिनविरोध विजयी झाले होते. तर सरपंचपदांच्या  7,619 जागांवर निवडणूक झाली. यात 699  सपंच बिनविरोध विजयी झाले. तर 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. राज्यभरातील आकडेवारी पाहता भाजपने सर्वाधिक म्हणजे 2023 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाल्याचा दावा केलाय. तर राष्ट्रवादीने 1215 ठिकाणी विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात देखील भाजपचे कमळ फुलले आहे. 


ठाणे जिल्हा 


42 ग्रामपंचायती पैकी  6  ग्रा.पं. चे सदस्य आणि सरपंच बिनविरोध
शहापूर तालुक्यातील नांदवळ आणि लवले या  दोन ग्रामपंचायीतमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने 34 सरपंच पदासाठी मतदान पार पडले 


भिवंडी
ग्रामपंचायत 14


भाजप : 8
उद्धव ठाकरे गट : 1
शिंदे गट : 4
अपक्ष : 1


निवडणूक झालेली नाही : 00


मुरबाड
ग्रामपंचायत 14


भाजप : 9
शिंदे गट : 5
अपक्ष : 1


निवडणूक झालेली नाही : 00


कल्याण
ग्रामपंचायत 9


भाजप : 2
शिंदे गट : 3
ठाकरे गट : 3
अपक्ष : 1


निवडणूक झालेली नाही : 00


शहापूर 
ग्रामपंचायत 5


भाजप : 1
शिंदे गट : 1
ठाकरे गट : 1
अपक्ष - 00


निवडणूक झालेली नाही : 00
 
ठाणे जिल्हा एकत्रित


42 ग्रामपंचायत 


भाजप : 20 
शिंदे गट : 13
ठाकरे  : 5 
अपक्ष : 2 


निवडणूक झालेली नाही : 00 


महत्वाच्या बातम्या


Election Results: राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व