Nashik Gram panchayat Result : अवघ्या नाशिक (Nashik) जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीचा (Grampanchayat Result) निकाल लागला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, त्या पाठोपाठ भाजपने (BJP) आपलं वर्चस्व सिद्ध केलय तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा (shinde Sena) अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत, छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेन चंचू प्रवेश करत 3 जागी संघटनेचा भगवा फडकविला आहे.  


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल जवळपास जाहीर झाला असून काही निवडक ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) बाकी असल्याचे समजते. दरम्यान सात तालुक्यातील 188 ग्रामपंचातींचा आज निकाल जाहीर झाला असुन त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीचे घड्याळ सुपरफास्ट ठरले आहे. त्या पाठोपाठ भाजपच्या कमळाने आघाडी घेतली आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. या सगळ्या निकालात छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय मिळवता आला आहे. 


दरम्यान शिंदें गटाचे आमदार, खासदार पालकमंत्री असतांनाही नांदगाव, मालेगाव व्यतिरिक्त पक्षाची फारशी ताकद दिसली नाही. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला मतदारसंघात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, देवळा, चांदवड मध्ये भाजप तर बागलाण कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात 15 पैकी 13 जागावर शिंदे गटाचा भगवा फडकविला आहे. आमदार राहुल आहेर यांच्यां चांदवड तालुक्यात भाजपला 14 जागा मिळल्यात. देवळा तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आपला गड राखला. 13 पैकी 11 जागी भाजप आलेत. दादा भुसे यांच्यां मालेगाव मध्ये शिंदे गटाला 6 तर भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत. 


नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल
दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकूण 196 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. दरम्यान माघारीनंतर आठ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर रविवारी 188 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येत होता. अखेर सरासरी 196 ग्रामपंचायतींचा निकाल घोषित झाला असून त्यानुसार 63 जागांसह राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल भाजप 55 जागा घेऊन दुसऱ्या नंबरवर आहे. शिवसेना (ठाकरे गट) 28 जागा, शिवसेना (शिंदे गट) - 22 जागा, काँग्रेस - 7 जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1 जागा, स्वराज्य संघटना - 3 जागा, इतर अपक्ष व पक्ष मिळून 17 जागांवर विजय मिळवला आहे.