एक्स्प्लोर

सावरकरांच्या नशिबी काळे पाणी, 'भारतरत्न'वरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर राराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आहे. परंतु केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर न केल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर राराजी व्यक्त केली आहे. भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांनी दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. परंतु वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी." त्यानंतर तासाभराने राऊत यांनी अजून एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये भारतरत्न पुरस्काराच्या सन्मानचिन्हाचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'विनायका प्राण तळमळला' विनायक सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सातत्याने ही मागणी लावून धरली आहे. परंतु सावरकरांना नेहमी डावलले गेले. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर ही मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली होती. परंतु भाजपच्या कार्यकाळातही सावरकरांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. काल संध्याकाळी भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते. यूपीए 2 कार्यकाळात म्हणजेच 25 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी यांनी पद ग्रहण केले होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 25 जुलै 2017 रोजी ते राष्ट्रपती पदावरुन पायउतार झाले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या मंचावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget