एक्स्प्लोर
मोदींची 'मन की बात' आता पुस्तकरुपातही उपलब्ध!
शनिवारी मुंबईतील राजभवनात 'मन की बात' या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील भाषणांचा संग्रह आता शब्द रूपातही उपलब्ध झाला आहे. शनिवारी मुंबईतील राजभवनात 'मन की बात' या पुस्तकाचा अनावरण सोहळा पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.
या सोहळ्याला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील सर्वात जुनं मात्र आजही प्रभावी असलेल्या रेडिओ या माध्यमाद्वारे या उपक्रमाची सुरूवात झाली असली तरी आज टिव्ही, मोबाईल, इंटरनेट या सर्व माध्यमांवर 'मन की बात' उपलब्ध आहे.
या सर्व माध्यमांसोबतच 'मन की बात' आता पुस्तक रुपातही उपलब्ध असेल. नरेंद्र मोदींच्या मन की बात या संकल्पनेतून 10 कोटींचा निधी ऑल इंडिया रेडिओकरता उभा राहिल्याचं राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसेच ‘मन ती बात’ने प्रेरित होऊन अपंगांच्या सोयीसाठी राजभवनातही खास रॅम्प उभारणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement