एक्स्प्लोर

धरण बुजवून शेती, बुलडाण्यात सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप

शेती करण्यासाठी समाजकल्याण विभागातील बहाद्दराने धरणात चक्क 700 ते 800 ट्रॉली माती टाकून मोठ-मोठे बांध टाकले आणि माती टाकून जेसीबी मशीनच्या सहाय्याने धरणाचे सपाटीकरण केले.

बुलडाणा : सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या धरणावर अतिक्रमण करुन समाजकल्याण विभागातील कर्मचारी गेल्या 7 वर्षांपासून शेती करतो आहे. तर शेती करण्यासाठी या बहाद्दराने धरणात चक्क 700 ते 800 ट्रॉली माती टाकून मोठ-मोठे बांधही टाकले आणि माती टाकून जेसीबी मशीनच्या सहाय्याने धरणाचे सपाटीकरणही केले आहे. धरणाचं सपाटीकरण केल्यानं धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी धरणाच्या शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसत असल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होते आहे. मात्र याविषयी परिसरातील शेतकरी पाटबंधारे विभागाकडे दाद मागून थकले. तरीही पाटबंधारे विभाग डोळ्यांवरील पट्टी काढायला तयार नाही आणि कब्जा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करायला धजावत नाही. त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव देशमुख येथे पाटबंधारे विभागाचे धरण असून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन हे धरण 25 ते 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीबरोबर समाजकल्याण विभागाचा कर्मचारी अरुण इंगळे आणि त्याचे कुटुंबाचीसुद्धा जमीन याच धरणात संपादित केली गेली होती. अरुण इंगळेला जमिनीचा मोबदलाही दिला गेला आहे आणि त्याला मिळालेल्या धरणग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर ते समाजकल्याण विभागात नोकरीवर सुद्धा लागला आहे. मात्र धरण झाल्यावरही धामणगावच्या धरणात अरुण इंगळे आणि त्यांच्या कुटुंबाने धरणात मोठ्या प्रमाणात माती-गाळ आणून टाकला आणि धरणात अतिक्रमण करून मोठं-मोठे बांध टाकले आणि त्यावर शेती करतो आहे. धरणात माती आणि बांध टाकल्याने परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात ज्यांची शेती धरणात संपादित झाली नसतानाही धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे आणि यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जातं आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. याविषयी परिसरातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नव्हे तर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वर्षांपासून न्यायासाठी उंबरठे झिजवले. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याने धरणावर कब्जा करुन मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात आणि भिंतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यात आठवड्यात वृक्षारोपण मोहीम राबवून 1200 वृक्षांची लागवड केली. मात्र या बहाद्दराने दुसऱ्या च दिवशी वृक्ष उपटून त्यामध्ये शेती केली आणि सोयाबीन पेरली. याविषयी शेतकऱ्यांनी विभागाकडे तक्रार केली आहे. तरीही काहीच कारवाई नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यां कडूनच वृक्षारोपण कार्यक्रमाला गालबोट लावल्यासारखे आहे. दरम्यान, ज्याच्यावर हे सर्व आरोप होत आहे, त्या अरुण इंगळेला जेव्हा याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी आपण धरणात कुठलेच गाळ टाकले नाही, आपले शेत धरणाच्या बुडीत क्षेत्राला लागून आहे, असे सांगितले. मात्र या प्रकरणी संबंधित विभागाची चुप्पीमुळे संबंध धरणाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
सामान्य प्रशासन विभागाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानची वृत्तपत्रे करणार बंद 
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget