Gondia News गोंदिया : एका बोगस डॉक्टराने कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण नसताना दवाखाना थाटून त्यात चक्क अवैध गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही खळबळजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव (Gondia Crime News) येथे घडली असून या बोगस डॉक्टरा विरोधात पोलिसांनी (Gondia Police) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगा उगारला आहे. नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टराचे नाव असून या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


कोणतीही पदवी नसताना करायचा अवैध गर्भपात


सरकारने बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांवर कारवाई करत असे प्रकार उघडकीस आणले आहे. अशातच गोंदिया (Gondia News)जिल्ह्यातील गोरेगाव येथे बोगस डॉक्टर असलेल्या नीतेश बाजपेयी याने चक्क अवैध गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उजेडात आणला आहे. या बोगस दवाखान्यात विविध विषयातले तज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यासाठी येत असल्याचे त्याने दवाखान्याचे फलकावर दाखविले. सोबतच नीतेश या दवाखान्यात डॉक्टर म्हणून गेल्या 6 महिन्यापासून कार्यरत असून त्याने आपल्या नावासमोर एमडी. डीएनबी अशी उपाधी देखील लावली होती. मात्र हा सर्व प्रकार जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकारची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. 


बोगस डॉक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पोलिसांनी (Gondia Police) अचानक केलेल्या या कारवाईत या प्रकरणाचे सत्य समोर आले. मुख्य म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी या दवाखान्यावर धाड टाकली असता, या दवाखान्यामध्ये एक महिला दीड महिन्याच्या बाळाचा गर्भपात करण्याकरीता आली असल्याचेही तपासतून उघड झाले आहे. या बनावट दवाखान्यामध्ये अवैध रूपाने गर्भपात केल्या जात असल्याच्या घटनेने गोंदिया जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


या प्रकरणी पोलिसांनी बोगस डॉक्टर विरोधात  विविध कलमान्वये गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर आता तरी अशा बोगस डॉक्टरांवर अंकुश बसेल का, अवैधरित्या होत असणारे गर्भपात थांबतील का, असे अनेक प्रश्न यानिमित्याने उपस्थित केले जात आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या