एक्स्प्लोर

मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांच्या चोरीमुळे खळबळ

मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांची चोरी झाल्यामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहे.

कोल्हापूर : मटणाच्या दरावरुन कोल्हापूर संपूर्ण राज्यात चर्चेला आलं आहे. अशातच कोल्हापूरकरांची धडधड वाढवणारी घटना घडली आहे. मटण दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बकऱ्यांची चोरी झालीय. जवाहरनगरमधील एका शेतकऱ्याच्या आठ बकऱ्या शेतातून चोरीला गेल्यात. याप्रकरणी राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. जवाहरनगरमधील शेतकरी काल (शुक्रवारी)दुपारच्या सुमारास अश्टर आधार परिसरात आपल्या बकऱ्यांना(शेळ्या)चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यादरम्यान काही अज्ञात लोक तिथं आले. "शेजारच्या अपार्टमेंटमध्ये शिळ्या भाकरी आहेत, त्या तुमच्या बकऱ्यांसाठी घेऊन या, तोपर्यंत आम्ही तुमच्या बकऱ्यांकडे लक्ष देतो", असं या अज्ञातांनी पोळ यांना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन पोळ अपार्टमेंटमध्ये गेले असता या अज्ञातांनी त्यांच्या आठ बकऱ्या लंपास केल्या. या प्रकरणी सुदार पोळ यांनी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार अज्ञात बकरी चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यात दुसरी घटना - काही दिवसांपूर्वी बकरी चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा आठ बकऱ्या चोरीला गेल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. तर, बकरी मालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, 31 डिसेंबर तोंडावर आहे, मटणाचे दर वाढले आहे. त्यात अशा घटना घडल्याने नागरिकही चिंतेत आहे. मटणाचे व्यापारी दर कमी करायला तयार नाहीत. तर, कोल्हापूरकरही देखील मटणदरवाढ कमी करण्यावर आडून बसले आहेत. त्यामुळे या बकरी चोरीमागे मटणाचे वाढलेले दर तर कारणीभूत नाहीत ना? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मटण दरवाढ थेट हायकोर्टात - मटण दरवाढीविरोधात मटणविक्रेत्यांवर दबाव टाकून दुकान बंद करण्याची नोटीस कोल्हापुरातील ग्रामपंचायतींनी घेतला होता. या निर्णयाचा मुंबई उच्च न्यायालयानं समाचार घेतला. अशाप्रकारे नोटीस बजावण्याचे कोणतेही अधिकार नसताना केलेल्या कारवाईचा खुलासा मागत गारगोटी आणि कडेगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही हायकोर्टानं नोटीस बजावली होती. हेही वाचा - मटण दरवाढीविरोधात नोटीस बजावल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस Mutton Price Issue | कोल्हापुरातील मटण दरवाढीचा वाद उच्च न्यायालयात | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget