एक्स्प्लोर
बेळगावात रेल्वे ट्रॅकवर तरुणीने स्वत:ला पेटवलं !

बेळगाव : बेळगावात एक तरुणीने रेल्वे ट्रॅकवर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. पहिल्या रेल्वे गेटजवळ हा थरारक प्रकार घडला असून पाहणाऱ्यांचे हात पाय अक्षरशः थरथरू लागले होते. प्राथमिक माहिती नुसार, ट्रॅकवर स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन पेटवून रेल्वे खाली येऊन आत्महत्या केलेल्या तरुणीची ओळख पटली असून, ती अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी आहे. रेल्वे ट्रॅकवर पेटवून घेऊन स्वतःला संपवण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. स्वतःला पेटवून घेऊन तिने रेल्वेखाली उडी घेतली आहे, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. बेळगाव रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत. मराठा मंडळ कॉलेज इंजिनियरिंग विभगात ती शिकत असल्याची माहिती देखील समोर येत आहे . घटना स्थळावर पडलेली कॉलेज बॅगमुळे पोलिसांनी तिची ओळख पटविली असून कोणत्या कारणाने तिने आत्महत्या केली असावी, याबाबत पोलीस तपास करत आहेत. अंगाला शहारे आणून देणारी घटना असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















