मुंबई : गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची (Ganesh Chaturthi) आस लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगन तयारीला लागले आहेत. येत्या 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होईल. गणेशोत्सवाच्या आधीचा आज शेवटचा रविवार आहे. आजच्या दिवशी सर्वांनाच सुट्टी असल्याने सार्वजनिक मंडळाच्या गणेश मुर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झालीय. शिवाय बाजारपेठांमध्ये देखील मोठी गर्दी झाली आहे. 


गणेशोत्सवाआधीचा आजचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी भक्तगन खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठा देखील सजल्या आहेत. 


गणरायाच्या आगमनानिमित्त आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.


मखर सजावट, पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.   प्लास्टिक बंदीमुळे कागदी, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण ग्राहक विकत घेत आहेत. याशिवाय लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांनकडून खरेदी केल्या जात आहेत. 


पुण्याच्या रविवारपेठेत गर्दी


आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा देखील सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील रविवार पेठेत आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळतंय. 


दादरमध्ये मोठी गर्दी 


सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राकांनी दादरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. लालबागची बाजारपेठ देखील सजावटीच्या वस्तूंनी फुलली आहे. उत्सवापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी लालबाग, परळ, दादर, मशीद बंदर, क्रॉफर्ड मार्केट आदी होलसेल व किरकोळ वस्तूंचे बाजार गर्दीने फुलून गेले.  


लालबाग-परळ आणि दादरमधील मिठाईची दुकानेही गर्दीने फुलून गेल्याचे रविवारी पाहायला मिळाले.  बाजारपेठेतील शोभेच्या वस्तूंची दुकाने तुडुंब भरलेली आहेत. गल्लोगल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभा करण्यात आले आहेत. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी रथ सजले आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Ganeshotsav 2022: सामाजिक भान जपणारा 'एक गाव, एक गणपती'; डहाणू तालुक्यातील उर्से गावातील गणेशोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 


Ganeshotsav 2022 : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक पोलीसांच्या कार्यालयात मिळणार वाहनांचा मोफत टोल पास