मुंबई : गणपती (Ganesh  Chaturthi) पाच दिवसांवर आले आहेत. कोकणात जाण्याची घाई सुरु झाली आहे. राज्य सरकारनं कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल फ्री ची घोषणा केली पण हा टोल फ्री प्रवास तुम्हाला पास काढूनच करता येणार आहे. आता हा पास मिळणार कुठे? काय करावं लागणार?  तुमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत. टोल फ्री पाससाठी मुंबईच्या वाहतूक पोलीसांकडे संपर्क करण्याचे आवाहन मुंबईचे वाहतूक पोलीस विभागीय आयुक्त राज तिलक रोशन यांनी केले आहे. 


गणपती मध्ये कोकणात जाणारा लोकांच्या साठी राज्य सरकार कडून टोल मुक्त करणयात आला आहे. टोल मुक्त साठी मुंबईच्या वाहतूक पोलीसांकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलीसांनी 24 तास टोल फ्री पाससाठी स्टाफची नेमणूक केले आहेत. प्रवाशांनी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना गाडी चा RC बुक आणि लायसन्स द्यावे लागणार आहे. वाहतूक पोलीस तात्काळ पास बनवून देणार आहेत. त्या पासद्वारे वाहनचालकांना कोकणात जाण्यासाठी टोल फ्री प्रवास करता येणार आहे.






कोकणात जाताय, टोलमुक्तीसाठी पास कसा मिळणार?



  • गणेशभक्तांना 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत पास मिळणार आहे.

  • 'गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन' असे स्टिकर्सरुपी पासेस देण्यात येणार आहेत

  • पाससाठी 50 वाहतूक विभागात स्वतंत्र पोलीस अंमलदारांची नेमणुक करण्यात आली आहे.

  • कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी त्यांचे वाहन क्रमांक, प्रवासाची तारीख, परतीची तारीख, चालकाचे किंवा मालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लायसन्स याविषयी माहिती द्यावी लागणार आहे


27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय ममहामार्ग-48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय ममहामार्ग 66) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर गणेशभक्तांसाठी कोणताही टोल  आकारला जाणार नाही. कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. ग्रामीण वा शहरी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे हे पास मिळणार आहेत. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 20220826138408418 असा आहे