एक्स्प्लोर
Advertisement
मुस्लिम तरुणाची गणपतीसाठी मोफत रिक्षा मोहीम
गणेश भक्त आरिफ पठाण यांनी यंदाही गणपती मूर्ती घरपोच पोहोचवण्यासाठी मोफत रिक्षा सेवा सुरु ठेवली आहे. घरपोच गणपतीसाठी मोफत रिक्षा देण्याचं हे त्यांचं यंदाचं सातवं वर्ष आहे.
कोल्हापूर: गणेश भक्त आरिफ पठाण यांनी यंदाही गणपती मूर्ती घरपोच पोहोचवण्यासाठी मोफत रिक्षा सेवा सुरु ठेवली आहे. घरपोच गणपतीसाठी मोफत रिक्षा देण्याचं हे त्यांचं यंदाचं सातवं वर्ष आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त आज दिवसभर गणेश मूर्ती मोफत घरपोच पोहचवण्याचा हा उपक्रम आहे, यंदा या उपक्रमात 20 रिक्षा सहभागी झाल्या आहेत.
आरिफ हे शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात राहतात. गेल्या दहा वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करतात. पाच वर्षांपूर्वी गंगावेश इथल्या कुंभार गल्लीत ते भाड्यासाठी थांबले होते. मात्र त्यावेळी रिक्षाचालक भाविकांकडून जादा भाडे आकारात होते. हे आरिफ यांना पटत नव्हतं. त्याचमुळे आरिफ यांनी सण-उत्सवाला मोफत रिक्षासेवा देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी या उपक्रमात त्यांनी 16 रिक्षांंचं नियोजन केलं होतं, यंदा त्या 20 वर जाऊन पोहोचल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्राईम
सोलापूर
Advertisement