एक्स्प्लोर

काकीला पळवणाऱ्या पुतण्याची काकाकडून थरारक हत्या

कोल्हापूर : बायकोला पळवल्याच्या रागातून आपल्याच पुतण्याची हत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी एकट्याने दोन्ही मारेकऱ्यांना हत्यारांसह जेरबंद केलं.   तीन वर्षांपूर्वी सुनील मगदूमने आपल्याच काकीचे अपहरण केल्याची तक्रार काका भीमराव मगदूम यांनी पोलिसात दाखल केली होती. पण तेव्हापासून सुनील खटल्याला हजर राहण्यास टाळाटाळ करत होता. पण आज अटकेची टांगती तलवार असल्याने तो गडहिंग्लजच्या कोर्टात आला.   कोर्टातून बाहेर पडताना भीमराव मगदूम आणि मुलगा रोहित मगदूम यांनी सुनीलच्या मोटरसायकलची पेट्रोलची पाईप काढून ठेवली. काही अंतर गेल्यानंतर सुनीलची बाईक बंद पडल्याचे हेरुन सुनीलवर हल्ला चढवला.   आधी रोहितने सुनीलच्या डोळ्यात चटणीपूड फेकली. त्यानंतर रोहितने केलेले जांबियाचे वार सुनीलने चुकवले. पण भीमरावने केलेल्या कुऱ्हाडीचे घाव सुनीलच्या वर्मी बसले. हा सगळा प्रकार भरदुपारी गावाच्या बसस्थानकासमोरच्या चौकात सुरु होता. त्यावेळी पळापळ झाली, पण जेव्हा सुनील रक्ताच्या थारोळ्यात जीवाच्या आकांताने तडफडत होता, तेव्हा कुणीही पुढे आले नाही.   तितक्यात हल्ल्याचा गोंगाट ऐकून जवळच राहत असलेले पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील धावून आले. त्यांनी हाती शस्त्र नसतानाही दोन्ही मारेकऱ्यांना हत्यारांसह जेरबंद केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान जखमी सुनीलला उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget