ट्रेंडिंग
ड्रायव्हरने यु-टर्न घेताच ट्रकने दिली धडक; NH हायवेवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, 1 गंभीर
आज दुपारी घडलेल्या या अपघातात मालवाहू ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला कारमध्येच तिघांचा मृत्यू झाला.
Gadchiroli Accident: कामानिमित्त कारने प्रवास करत असलेल्या चौघांना अपघाताने मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय महामार्गावर अचानक घेतलेल्या यु-टर्नमुळे कारला ट्रकची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना चामोर्शी शहरातील आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर घडली. रविवारी दुपारी हा अपघात घडला. (National Highway Accident)
या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे – विनोद पुंजाराम काटवे (45), राजू सदाशिव नैताम (45) आणि सुनील वैरागडे (55), असून हे तिघेही गडचिरोली येथील रहिवासी आहेत. गंभीर जखमी अनिल मारोती सातपुते (50) हे चामोर्शीचे रहिवासी असून, त्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयातून गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
भरधाव मालवाहू ट्रकची जोरदार धडक
गडचिरोलीत घडलेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. कारमधून जाणारे चारही व्यक्ती एका कारमधून चामोर्शीमधील आष्टीकडे कामानिमित्त जात होते. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर येताच कारचालकाने अचानक यु-टर्न घेतला. याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी घडलेल्या या अपघातात मालवाहू ट्रकची धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः शतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला कारमध्येच तिघांचा मृत्यू झाला.घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला असून कार क्रेन लावून बाजूला काढली आहे. भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हेही वाचा: