RR vs PBKS IPL 2025 : पंजाबचा राजस्थानवर 10 धावांनी विजय, प्लेऑफसाठी ठोकली दावेदारी

Rajasthan Royals vs Punjab Kings Live Score : सुपर संडे 18 मे रोजी आयपीएल 2025 मध्ये पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे.

किरण महानवर Last Updated: 18 May 2025 07:23 PM

पार्श्वभूमी

RR vs PBKS Live Updates : सुपर संडे 18 मे रोजी आयपीएल 2025 मध्ये पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या हंगामातील हा 59 वा...More

पंजाबचा राजस्थानवर 10 धावांनी विजय

फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव करून प्लेऑफसाठीचा आपला दावा मजबूत केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत पाच गडी बाद 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 20 षटकांत सात गडी गमावून 209 धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके झळकावली, पण पंजाबने त्यांच्या गोलंदाजांच्या बळावर पुनरागमन केले.