एक्स्प्लोर

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला; 15 किलो स्फोटकं नष्ट

नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत रचलेला घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन निकामी करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रचलेला घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने लावलेले 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन निकामी करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गडचिरोली पोलीस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. त्यावेळी रस्त्यावर त्यांना 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन आढळून आले. नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीनं ही स्फोटकं पुरुन ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांना घटनास्थळी पाचारण केलं. पथकांना 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन घटनास्थळीच सुरक्षितरित्या निकामी करण्यात यश आलं. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कट फसला आणि घातपाताच डाव उधळला गेला. दरम्यान, 2 ते 8 डिसेंबर नक्षली संघटनेने PLGA (People's Liberation Guerrilla Army)च्या 19 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त संपूर्ण दंडकारण्य बंदच आव्हान केलं आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी नक्षल्यांकडून भामरागडच्या लाहेरी ते धोडराज रस्त्यावर 15 किलो स्फोटकं ठेवली होती. यातून मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. क्लेमोर माईन नष्ट करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अधिाऱ्यांनी दिलल्या माहितीनुसार, स्फोटकाचं वजन पाहता मोठी हानी जिवीतहानी होण्याची शक्यता होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक शैलेश बालकवडे यांनी पोलिसांना गौरवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जून 2026 | गुरुवार
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Maharashtra Live News Updates: विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget