एक्स्प्लोर
रक्तदान करा आणि मोफत पाच लिटर पेट्रोल मिळवा, सोलापुरात रक्तदानासाठी लागल्या रांगा
एरवी रक्तदान करण्यासाठी हवा प्रतिसाद मिळत नसल्याने रक्तपेढ्यांना जनजागृती करावी लागते. जनजागृती करून देखील अनेकदा रक्तदाते मिळत नाही. मात्र सोलापुरातील या अनोख्या प्रयोगामुळे रक्तदानासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सोलापूर : रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. लोकांनी रक्तदान करावे यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रम आणि जनजागृती केली जाते. सोलापुरात मात्र लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.
सोलापुरात रक्तदान करणाऱ्याला चक्क पाच लिटर पेट्रोल भेट म्हणून दिले गेले आहे. सिद्धेश्वर हायवे सेंटर पेट्रोल पंपतर्फे कै गिरीश सतीश जम्मा यांच्या स्मरणार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
एरवी रक्तदान करण्यासाठी हवा प्रतिसाद मिळत नसल्याने रक्तपेढ्यांना जनजागृती करावी लागते. जनजागृती करून देखील अनेकदा रक्तदाते मिळत नाही. मात्र सोलापुरातील या अनोख्या प्रयोगामुळे रक्तदानासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी रक्तदान करून कुणी थेट गाडीत पेट्रोल घेत होतं तर कुणी पेट्रोल घेण्यासाठी चक्क डबेच आणले. या शिबिराला दुपारपर्यंतच 700 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता. अपेक्षेपेक्षा जास्त रक्तदान झाल्याने आयोजक देखील आनंदी आहेत.
राज्यातल्या जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याची गरज आहे. त्यासाठी टोपी, बॅचसारख्या वस्तू वाटल्या जातात मात्र अमिष अथवा प्रलोभन दाखवून रक्तदान करवून घेणं हे कायद्याने गुन्हा आहे.
रक्तदान संदर्भात जो कायदा आहे त्यात रक्तदात्याची व्याख्या करण्यात आली आहे. जो शारीरिक दृष्ट्या सदृढ असेल आणि कोणत्याही फायद्या अथवा मोबदल्याविना रक्तदान करत असेल तर तो रक्तदाता. त्यामुळे अशा प्रकारे प्रलोभन किंवा अमिश दाखवून रक्तदान करणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र रक्तसाठ्याची स्थिती पाहता जर प्रोत्साहन म्हणून भेट वस्तू दिली असली तर त्यात गैर काही नाही, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
काहीही असलं तर सोलापुरात मात्र या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची चर्चा बरीच रंगली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement