एक्स्प्लोर
coronavirus | सांगली कोरोनाचे 12 नवे रूग्ण, जिल्ह्याचा आकडा 24 वर
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24वर पोहचली आहे. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत.
सांगली : सांगलीमधील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सांगली येथे आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.सगळे सांगलीतील करून रुग्णांचा आकडा 24 वर पोहोचला आहे.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या इस्लामपूर मधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांगलीतील आणखी 25 जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल बारा जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. 13 मार्च रोजी सौदी अरेबिया मधून इस्लामपूर येथील चार जण उमराह देवदर्शन यात्रेनंतर परतले होते. त्यानंतर या चौघांना 23 मार्च रोजी कोरोना लागण झाली होती. त्यानंतर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केलं होतं. तरी यामधील पाच जणांना कोरोना लागण झाली होती. तर गुरुवारी(26 मार्च) त्या कुटुंबाच्या संपर्कातील इस्लामपूर मधील दोन आणि कोल्हापूरच्या वडगाव मधील एक अशा तिघांना कोरोना लागण झाल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले होते.
बुधवारी(25 मार्च) 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ज्यांचे रिपोर्ट आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यामधील तब्बल 12 जणांना कोरोना लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 24वर पोहचली आहे. हे सर्व रूग्ण इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. यातील 4 जण हे परदेश वारी करून आले होते व त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील व त्यांच्या संपर्कात आलेल्या अशा 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असून यापैकी कोणालाही अतिदक्षता विभागात ठेवले नसून त्यांना व्हेंटीलेटरचीही आवश्यकता लागलेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये. यापूर्वीचे 12 आणि शुक्रवारी (27 मार्च) नव्याने कोरोनाची लागण झालेले आढळून आलेले 12 अशा सर्व रूग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या नव्याने काही लक्षणे उद्भवल्यास त्यांना तद्अनुषंगाने उपचार देण्यात येतील. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा अत्यंत समन्वयाने सांगलीकरांसाठी झटत आहे. त्यामुळे जनतेने पॅनिक होऊ नये व घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | प्रिन्स चार्ल्सनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनाही कोरोनाची लागण
coronavirus : शिर्डी साई संस्थानाकडून 51 कोटींची मदत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement