एक्स्प्लोर

पंढरपूरजवळ भीषण अपघात, देवदर्शनासाठी आलेल्या पाच जणांचा मृत्यू

Solapur Pandharpur accident : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांची बोलेरो गाडी थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या धनगरवाडी, बेळगाव, कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांची बोलेरो गाडी थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहाटेच्या वेळी झोपेत हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिला, दोन पुरूष आणि एक अकरा वर्षाची मुलगी अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आता उरलेल्या 11 जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत .

हा अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास कासेगाव परिसरात (सातवा मैल) घडला. जखमींना येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले.

याबाबतची माहिती अशी की, चंदगड( कोल्हापूर) येथील 16 भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगावजवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला पाठी मागून बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झाला. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

या अपघातातील सर्व मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सखाराम धोंडिबा लांबोर ( 50 ) ,  शांताबाई लक्ष्मण लांबोर, पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर, नगुबाई काळू लांबोर (सर्वजण राहणार धनगरवाडी, धामणे, जिल्हा बेळगाव, कर्नाटक ) आणि तुकाराम खंडू कदम ( रा.बादराई कडवळे, ता.चंदगड, जिल्हा. कोल्हापूर ) अशी आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget