Nagpur News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शहरातच पोलिस उपायुक्तांची चार पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आधीच कामाच्या ताणात असलेल्या पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. दहा दिवसांपूर्वी शहरातील उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी शहराला दोन पोलिस उपायुक्त (Nagpur Police) पदोन्नतीने मिळाले आहेत. सहायक पोलिस आयुक्त असलेल्या अश्विनी पाटील आणि संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक असलेले राहुल मदने अशी पदोन्नत दोन उपायुक्तांची नावे आहेत.


राज्यात चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पंधरा दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये शहरातील आस्थापनाचे डॉ. बसवराज तेली, परिमंडळ चारचे नुरुल हसन, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड यांचा समावेश होता. त्यापूर्वीच पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया, अक्षय शिंदे, लोहित मतानी यांची बदली करण्यात आली होती. मात्र बदली होत नसल्याने त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाचा ताण वाढला होता. त्यात आणखी 3 जणांची बदली झाल्यावर त्यांच्या कामाचीही धुरा केवळ चार उपायुक्तांवर आली होती. मात्र, बुधवारी गृहविभागाकडून देण्यात आलेल्या पदोन्नतीमध्ये महाराष्ट्र पोलिस सेवेतील अश्विनी पाटील आणि राहुल मदने या पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे. याशिवाय अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी कल्पना भराडे यांचीही निवड करण्यात आली आहे.


संगमनेर येथे उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल मदने हे इंदापूर तालुक्यातील कालठण या गावातील पहिले अधिकारी आहेत. त्यांची एक बहिण शिक्षिका तर दुसरी बहिण सहायक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांची एक बहिण शिक्षिका तर दुसरी बहिण सहायक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहेत.


अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेमध्ये 2016 ला सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि बृहन्मुंबई येथे सहायक पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.


कामाचा ताण कायमच


शहराला दोन पोलिस उपायुक्त मिळाले असले तरी, पोलिस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. सध्या तीन पोलिस उपायुक्तांपैकी चिन्मय पंडित यांच्याकडे गुन्हे शाखा, विशेष शाखा, सायबर आणि आर्थिक सेलची जबाबदारी आहे. संदीप पखाले यांच्याकडे परिमंडळ पाच आणि दोनची जबाबदारी आहे. चेतना तिडके यांच्याकडे परिमंडळ 1 आणि वाहतूक शाखेचा कार्यभार आहे.


महत्त्वाची बातमी


Companies Laid Off Employees: 2022 मध्ये या कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचारी काढून टाकले, खर्चात केली कपात; जाणून घ्या