Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) गोदावरी (Godawari) प्रेमी तर्फे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. रामकुंडावर (ramkunda) हे आंदोलन करण्यात आलं असून राज्य सरकारच्या 'चला जाणू नदी' या उपक्रमात गोदावरीचा समावेश नसल्याने गोदावरी प्रेमींनी आंदोलन छेडले. विशेष म्हणजे जेव्हा या उपक्रमाची आखणी केली गेली, तेव्हा राज्य सरकारने याबाबत काढलेल्या अध्यादेशात गोदावरीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील तब्बल 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ हा महत्त्वाकांक्षी नदीयात्रा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. गांधी जयंतीला (Gandhi Jayanti) प्रारंभ झालेल्या या नदीयात्रा उपक्रमातून देशातील दुसर्या क्रमांकाच्या असलेल्या गोदावरी नदीलाच वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या उपक्रमासाठी नेमण्यात आलेले समन्वयकही बुचकळ्यात पडले आहे. गोदावरी नदीशिवाय हा उपक्रम पूर्ण होऊच शकणार नाही, अशा भावनाही अनेकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसेच गोदावरीच्या संवर्धनासाठी शासनाने या उपक्रमात गोदावरीला अग्रस्थान देण्याची गरज असल्याची मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील नाराज गोदावरी प्रेमींनी थेट रामकुंडावर आंदोलन छेडले.
गोदावरी नदीचा उपक्रमात समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 75 व्या अमृत महोत्सवी निमित्ताने चला नदीला जाणून घेऊया या उपक्रमात शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 75 नद्यांचा इतिहास जाणून घेतला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील समावेश त्यांच्या जीआरमध्ये केला. सहभागी नद्या वालदेवी नदी, कपिला नदी, नंदिनी नदी, म्हाळुंगी नदी, मोती नदी म्हणून आज सर्व नाशिककर साधू महंत पुरोहित संघाच्या सोबत आज या रामकुंडावर आत्मक्लेष आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. गोदावरी नदीचा समावेश नदी यात्रेत करावा अशी मागणी आंदोलकाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जाईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर महत्वाचं उपक्रमाचा शुभारंभ झाला तेव्हा गोदावरीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते, आता अचानक नाव वगळले आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती व मोती या नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, नाशिकमधील मुख्य नदी असलेल्या तसेच दर 12 वर्षांनी याच नदीच्या तीरावर कुंभमेळा भरणार्या गोदावरीचे नाव मात्र उपक्रमातून वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककर एकवटले असून या उपक्रमात गोदावरीचे नाव समाविष्ट करावे यासाठी आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले.
‘चला जाणू या नदीला’ उपक्रम
एकीकडे राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा तसेच पश्चिम वाहिन्यांच्या खोर्यातील नद्या उगम ते संगम अमृतवाहिनी करण्यासाठी ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमांतर्गत नद्यांची परिक्रमा केली जाणार होती. नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान 100 जणांचा सहभाग असावा, असा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी राज्यातील 75 नद्यांचा अभ्यास केला जाणार असून त्याद्वारे त्या या ठिकाणी नदीच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.