Companies Laid Off Employees : सध्या मंदीच्या भीतीने जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्या धास्तावल्या आहे. 2022 मध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे वृत्त आहे. या यादीत मोठ्या कंपनीची नावे आहेत, ज्या कंपनीतून अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. यामध्ये Microsoft, Twitter, Ola, Ford, Unacademy, Byju, HCL, Facebook, Xiaomi, Oracle, Wipro, Netflix इत्यादी नावांचा समावेश आहे.
मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
टेक क्षेत्रातील नावाजलेली कंपनी मायक्रोसॉफ्ट आहे. माहितीनुसार या कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीने कर्मचार्यांची संख्या अद्याप स्पष्ट केलेली नाही, परंतु असे सांगण्यात येते की, कॉस्ट कटींग प्रक्रियेत कंपनीने जगभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी काढून टाकले आहेत.
Unacademy
शिक्षण क्षेत्रातील मोठ्या दोन्ही कंपन्या म्हणजे Unacademy आणि Byju. युनाकॅडमीने यापूर्वी 150 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, कंपनीच्या सीईओने याचा स्पष्ट नकार दिला होता. कंपनीत प्रत्येकाला त्यांच्या कामानुसार भूमिका देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. Unacademy ची उपकंपनी असलेल्या 'रेलवेल'नेही आपले कर्मचारी कामावरून कमी केले आहे.
Byju
बायजूने या वर्षी हजारो कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले असून कंपनी 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही त्यांची कॉस्ट कटींग करण्याची पद्धत आहे कारण कंपनीच्या फंडींगमध्ये समस्या होत्या.
ट्विटर
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतला असून कंपनीचा बॉस झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीची योजना एकूण 7500 कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची आहे.
ओला
ओला टॅक्सी सर्व्हिसनेही यावेळी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले असून त्यांचे अप्रैजलही केले नाही. पुनर्रचना प्रक्रियेचा एक भाग म्हणून, ओलाने सुमारे 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
गॅप
गॅप इंकने अलीकडेच त्याच्या सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क कार्यालयातून सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील ही ताजी टाळेबंदी आहे. या टाळेबंदीवरून कंपनीची अंतर्गत परिस्थिती चांगली नसल्याचे दिसून येते.
फोर्ड
यूएस-आधारित कंपनी फोर्डने सुमारे 3000 कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना काढून टाकले आहे. हे कर्मचारी अमेरिका, कॅनडा आणि भारतातील आहेत, ज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनी आता आणखी कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी करत आहे.
या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कंपन्या HCL, Miata, Xiaomi, Oracle, Tencent आणि Wipro आहेत. या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे समजत आहे.