एक्स्प्लोर
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर अपघात, 4 भाविकांचा मृत्यू
देव दर्शनाहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जोतिबा फाटा येथे मोठा अपघात झाला आहे.
कोल्हापूर : देव दर्शनाहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जोतिबा फाटा येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व भाविक हे मिरज येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब गणपतीपुळ्याच्या बाप्पाचे दर्शन घेऊन घरी परतत होते. त्याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
तवेरा या कारमधून तांदळे कुटुंबीय गणपतीपुळे येथून देवदर्शन करुन कोल्हापूर-पन्हाळा रोडवरुन घरी जात होते. यादरम्यान, गाडीचे टायर फुटले व त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत असलेल्या डोहात बुडाली. शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement