शिखर बँकेतील घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, एकेकाळचे शरद पवारांचे समर्थक रामप्रसाद बोर्डीकरांचा आरोप
शिखर बँकेतील घोटाळ्याला अजित पवार जबाबदार आहेत. त्यांच्या चुकीमुळे शरद पवार अडचणीत आल्याचा आरोप बोर्डीकरांना केला.
परभणी : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि शिखर बँकेचे संचालक रामप्रसाद बोर्डीकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. बँकेत जो घोटाळा झाला तो चुकीचाच आहे. या घोटाळ्याला सर्वस्वी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप बोर्डीकरांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेत राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आम्ही विरोधात होतो. त्यावेळी पवार कुटुंबातील लोक जे सांगतील तेच तिथे ऐकलं जायचं. आम्ही विरोध केल्यामुळेच आमच्यात मतभेद झाले, असं बोर्डीकरांनी म्हटलं.
शिखर बँकेतील घोटाळ्याला अजित पवार जबाबदार आहेत. त्यांच्या चुकीमुळे शरद पवार अडचणीत आल्याचा आरोप बोर्डीकरांना केला. आपण केलेल्या चुकीमुळे पवार साहेबांना त्रास होत आहे, हे पाहून अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं, असं बोर्डीकरांनी म्हटलं.
रामप्रसाद बोर्डीकर हे 20 वर्ष जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यावेळी मात्र त्यांनी स्वतः न उभे राहता त्यांच्या कन्या मेघना यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
EXPLAINER VIDEO | शिखर बॅंक घोटाळा आणि महाराष्ट्राचं राजकारण | बातमीच्या पलीकडे | ABP Majha