एक्स्प्लोर

माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा अखेर काँग्रेसला रामराम; अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव मुलगा झिशानच्या निर्णयावर काय म्हणाले?

अजित पवार हे कौतुकासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात  हे त्यांचं मोठेपणा आहे, आगे आगे देखो होता है क्या असेही माजी मंत्री बाबा सिद्दीकी म्हणाले. 

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून पक्षाला रामराम केल्याची घोषणा केली. सिद्दीकी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी तरुणपणी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, परंतु या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडताच काय म्हणाले?

काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर बाबा सिद्दीकी म्हणाले की, मी इतकी वर्ष या परिवारात राहिलो आहे. या परिवारात होणाऱ्या घडामोडी विरोधात मी इतके वर्ष बोललो त्या माध्यमांवर सांगू शकत नाही. मी राजीनामा दिला असून कारण न बोललेलं बरं. झिशानचा निर्णय त्यांना विचारा. मी जिथे जाईन तिथं पक्षासोबत पीसी घेईन. 10 तारखेला एक सभा होईल, माझ्याबरोबर असणारे लोकं त्यामध्ये येतील. अजित पवार हे कौतुकासारखेच आहेत. अजित पवार आपल्या सर्व लोकांकडे लक्ष ठेवतात  हे त्यांचं मोठेपणा आहे, आगे आगे देखो होता है क्या असेही ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, माझा संबंध राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी आणि खर्गे यांच्या सोबत अनेक वर्ष राहिला आहे. मला पक्ष सोडताना कोणी कॉल केला हे सांगणं उचित नाही. मी हा निर्णय अचानक घेतलेला नाही. याबाबत मी वरिष्ठांना पंधरा-वीस दिवसापूर्वीच कळवला आहे. माझी देखील मजबुरी आहे त्यामुळे हा निर्णय घेतला. दुःख तर होतं आहे, पण ते शोधा कोणामुळे. कोणत्याही गोष्टीबाबत मला कमिटमेन्ट केलं नाही. झिशन त्याचा निर्णय तो स्वतः घेईल. काही नोटीसा वैगेरे मला नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा 

दरम्यान, बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान यांनीही अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. बाबा सिद्दीकी हे वांद्रे विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि ते महाराष्ट्रातील मोठ्या मुस्लिम चेहऱ्यांपैकी एक आहेत.

मिलिंद देवरा यांनीही काँग्रेस सोडली 

बाबा सिद्दीकी यांच्या आधी माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 47 वर्षीय मिलिंद देवरा यूपीए-2 च्या कार्यकाळात काही काळ मंत्री होते. मिलिंद देवरा यांनी ट्विट करून पक्ष सोडल्याची माहितीही दिली होती. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget