एक्स्प्लोर

नांदूर-मध्यमेश्वरमध्ये महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचं आगमन

नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.

नाशिक : पक्षी सप्ताहाला आज पासून सुरुवात होत आहे. आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत. हिवाळ्याची चाहुल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचं म्हणजे पक्ष्यांचं आगमन होत असतं. मात्र यंदा हे पाहुणे तब्बल महिनाभर आधिच मुक्कामी आले आहेत. सध्या काही पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. नांदूर-मध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात या पक्षांसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक असलेलं खाद्य म्हणजेच शेवाळ, कीटक, मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे परदेशी पाहुणे महिनाभर आधीच आल्यामुळे पक्षीप्रेमींनाही सुखद धक्का बसला आहे. युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून हे पक्षी तर येथे येतातच. शिवाय देशी पक्षांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी थापाट्या, गढवाल, तरंग पक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, ऑस्प्रे, पेटेंड स्टोर्क, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, ईगल, स्पून बिल, स्पोटेड ईगल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. काही पक्ष मस्त आकाशात घिरट्या घालतात, तर काही बदक आपलं खाद्य शोधण्यासाठी चक्क शिरसासन करताना आढळतात. विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण येथे असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण न चुकता येतात तर काही प्रथमच पक्षी निरिक्षणासाठी येतात. वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा मुक्काम या ठिकाणी आणखी काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

Embed widget