एक्स्प्लोर
शिर्डीत भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये घुसून गोळीबार
शिर्डी : शिर्डीत भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्या घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूरमध्ये काल रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
प्रकाश चित्ते अवैध धंद्याना विरोध करत असल्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश चित्ते हे भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस आहेत. याआधीही प्रकाश चित्ते यांच्यावर गोळीबार झाला होता.
काही दिवसांपूर्वीच गोंदियात भाजपचा स्वीकृत नगरसेवक शिव शर्मानं काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणे आता नेते मंडळीही भिडत असल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement