एक्स्प्लोर

Narhari Zirwal : मंत्रालयातील लाचखोर राजू ढेरेंगेवर निलंबनाची कारवाई, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आदेश

FDA : अन्न आणि औषध प्रशासनातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. एसीबीकडे त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

मुंबई : मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणी (FDA Ministry Bribe Case) मोठी अपडेट समोर आली आहे. लाच घेतलेल्या राजू ढेरेंगेला अखेर अन्न आणि औषध प्रशासन विभागातून निलंबित करण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजू ढेरेंगेला विभागातून निलंबित करण्यात आलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून राजू ढेरेंगे हा मंत्री आस्थापनेवर कार्यरत होता. या लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. 

नरहरी झिरवाळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांना या आधीच कार्यमुक्त करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राजू ढेरेंगे याच्यावर विभागाने मोठी कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान 35 हजारांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरिंगेला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने ढेरिंगेला जामीन मंजूर केला.

मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट

दरम्यान, लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. एसीबी कारवाई करण्यासाठी मुक्त आहे, परंतु मंत्र्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे मंत्री झिरवाळ यांचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरीचे प्रकरण बाहेर आलं आहे. त्यांची आता चौकशी देखील सुरू आहे. सोमवारपासून  सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या विभागातील अधिकाऱ्यांची होत असलेल्या चौकशीत सर्व काही निष्पण होईल, आपण सर्वांना उत्तर देण्यास तयार आहे असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कारवाई  करण्यात आली आहे. झिरवाळ यांच्या खासगी सचिव रामदास गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. वादग्रस्त अधिकारी रामदास गाडे यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत म्हणजेच पशुवैद्यकीय विभागात  पाठवण्याचे आदेश नरहरी झिरवळांनी दिले आहेत.  

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Embed widget