एक्स्प्लोर
'समृद्धी हायवे'विरोधात शेतकऱ्याचं राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी आज राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो आंदोलनाचं आयोजन केलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये आज मोठं जनआंदोलन उभं राहणार आहे.
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणल्याने तुमच्यावर कारवाई का करु नये?, अशी विचारणा या नोटीसमध्ये केली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
जमीन
एकूण वन जमीन 399 हेक्टर
एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
पडीक जमीन 2922 हेक्टर
एकूण जमीन 20820 हेक्टर
खर्च
बांधकाम 24 हजार कोटी
आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
भूसंपादन 13 हजार कोटी
इतर 3 हजार कोटी
एकूण खर्च 46 हजार कोटी
संबंधित बातम्या :
समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस
समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण
समृद्धी हायवेच्या मोजणीसाठी अधिकारी पुन्हा दाखल, शिवडे गावात तणाव
VIDEO: स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement