मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या शेतकरी आंदोलनात शिवसेना नेत्यांचा सहभाग नसल्याबाबतची टीका होत आहे. या विषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता, शिवसेनेचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे असे त्यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही, असेही ते म्हणाले.


आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीकडून शरद पवार नेतृत्व करत आहेत, मुख्यमंत्री देखील बोलत आहेत. या आंदोलनाला 60 दिवस उलटूनही केंद्र सरकारने दखल घेतली नाही, हा प्रश्न विचारायला हवा. शिवसेनेचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे असे स्पष्ट केले.


दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Maharashtra Mumbai Farmers Protest)  समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. तिथून मोर्चा राजभवनाकडे जात असताना मेट्रो सिनेमा चौकात अडवला गेला. त्यानंतर राज्यपाल मुंबईत नसल्याची माहिती मोर्चेकऱ्यांना मिळाली. राज्यपाल स्वत: वेळ देऊनही उपस्थित नसल्याने संयुक्त मोर्चा चांगलाच आक्रमक झाला. राज्यपालांच्या या कृतीचा निषेध करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.


राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ


पवार म्हणाले की, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं शरद पवार म्हणाले.


संबंधित बातम्या :



'राज्यपाल गोव्याला पळाले' म्हणत आंदोलकांनी निवेदन फाडलं! उद्या तिरंग्याला वंदन करुन मोर्चा परतणार




किसान मोर्चा उद्यापर्यंत आझाद मैदानातच, उद्या प्रजासत्ताक दिन साजरा करणार - काँग्रेस नेते सचिन सावंत